आर्थिक घडामोडी

75 रुपयांचे विशेष नाणे

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ 75 रुपयांचे विशेष नाणे जारी करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थ मंत्रालयाने केली आहे.

भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ हे विशेष नाणे जारी करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी देशातील नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. ज्यासोबत हे विशेष नाणेही लाँच करण्यात येणार आहे

75 रुपयांची पहिली नाणी कधी जारी करण्यात आली:
विशेष कार्यक्रमांमध्ये 75 रुपयांचे नाणे जारी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही हे विशेष नाणे जारी करण्यात आले आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये, अन्न आणि कृषी संघटना (FAO) च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रुपयांचे स्मारक नाणे जारी करण्यात आले.

2,000 च्या नोटा चलनातून काढून टाकल्या जाणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अलीकडेच जाहीर केले की ₹ 2,000 च्या नोटा चलनातून काढून टाकल्या जातील.

असा निर्णय भारतात प्रथमच घेण्यात आलेला नाही. याआधीही देशात उच्च मूल्याच्या नोटांचा साठा रोखण्यासाठी असे निर्णय घेण्यात आले आहेत.

नोटाबंदीचा इतिहास काय आहे:
असा निर्णय भारतात प्रथमच घेण्यात आलेला नाही. याआधीही देशात उच्च मूल्याच्या नोटा जमा करण्यापासून रोखण्यासाठी असे निर्णय घेण्यात आले आहेत.

1978 मध्ये पहिल्यांदा नोटाबंदी झाली: स्वातंत्र्यानंतर 1978 मध्ये तत्कालीन मोरारजी देसाई सरकारने देशातील काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला.

मोरारजी देसाई सरकारने मोठ्या नोटांवर बंदी घातली होती. तत्कालीन जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने 1000, 5000 आणि 10,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या.

₹ 1,000, ₹ 5,000 आणि ₹ 10,000 च्या नोटा 1954 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आल्या, ज्या नंतर 1978 मध्ये बंद करण्यात आल्या.

2016 मध्ये नोटाबंदीचा मोठा निर्णय घेत मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2000 ची नोट जारी करण्यात आली.

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या अजय बंगांची नियुक्ती

  • भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • जागतिक वित्तीय संस्थेची धुरा सांभाळणारे ते पहिले भारतीय-अमेरिकन नागरिक आहेत.
  • ते २ जून रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील.
  • अजय बंगा यांचा जन्म पुण्यात झाला. 
  • अंजय बंगा यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली.
  • आयआयएम अहमदाबादमधून एमबीए.
  • अजय बंगा यांनी नेस्ले, सिटी ग्रुप, मास्टरकार्डसारख्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे.
  • २०२१ मध्ये मास्टरकार्ड या कंपनीतून निवृत्ती घेतली त्यानंतर खासगी इक्विटी फर्म जनरल अटलांटिक जॉईन केली.
  • बंगा हे जनरल अटलांटिक कंपनीत ३.५ अरब डॉलरच्या क्लायमेट फंडच्या अ‍ॅडव्हायजरी बोर्डाचे सदस्यही आहेत.
  • वर्ष २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं.