क्रीडा घडामोडी

2023 – आयपीएलमधील पुरस्कारांची पूर्ण यादी!

 चेन्नई सुपर किंग्ज संघाने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सवर डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार पाच गडी राखून विजय मिळवला व आपले पाचवे विजेतेपद पटकावले.

चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सच्या पाच जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

 चेन्नई सुपर किंग्ज संघाने १० वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. त्यापैकी पाचवेळी त्यांनी विजय मिळवला आहे.

आयपीएल २०२३ विजेतेपद -: चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएल २०२३ उपविजेतेपद :- गुजरात टायटन्स

इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन : यशस्वी जयस्वाल
सुपर स्ट्राईकरेट ऑफ द सीजन : ग्लेन मॅक्सवेल (१८९.४९)
गेम चेंजर ऑफ द सीजन : शुभमन गिल

परफेक्ट कॅच ऑफ द सीजन : राशिद खान
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) : मोहम्मद शामी (२८ विकेट्स)
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) : शुबमन गिल (८९० धावा)
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन : शुबमन गिल
फेअर प्ले अवॉर्ड : दिल्ली कॅपिटल

यशस्वी जैस्वालने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकले

राजस्थान रॉयल्स (RR) संघाची सलामीवीर आणि भारतीय संघाचे भविष्यातील यशस्वी जैस्वालने IPL इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक झळकावून विक्रम केला आहे.

21 वर्षीय जयस्वालने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात केवळ 13 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि IPL मधील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला.

आयपीएल 2023 चा 56 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळला गेला. कोलकाताने राजस्थानसमोर विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

यशस्वीने राहुलचा विक्रम मोडला.
आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या बाबतीत यशस्वीने केएल राहुलचा विक्रम मोडला, राहुलने 14 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.