महत्वाचे पुरस्कार

बल्गेरियन कादंबरीसाठी प्रथमच बुकर पुरस्कार

लेखक जॉर्जी गोस्पोडिनोव्ह यांना यावर्षीचा प्रतिष्ठित बुकर पुरस्कार मिळाला आहे.

त्यांच्या ‘टाइम शेल्टर’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

प्रथमच बल्गेरियन कादंबरीला हा पुरस्कार मिळाला आहे.

अँजेला रॉडल यांनी त्याचे इंग्रजीत भाषांतर केले.

टाइम शेल्टर ही भूतकाळातील आठवणींना उजाळा देणारी कथा

टाईम शेल्टर ही “क्लिनिक फॉर द पास्ट” नावाच्या क्लिनिकची कथा आहे. येथे अल्झायमरने ग्रस्त असलेल्या लोकांना मदत केली जाते.

2022 चा बुकर पुरस्कार भारताच्या लेखिका गीतांजली श्री यांनी जिंकला. त्यांच्या टॉम्ब ऑफ सॅन्ड या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

बुकर पुरस्काराची स्थापना 1969 मध्ये
बुकर पुरस्काराचे पूर्ण नाव मॅन बुकर प्राइज फॉर फिक्शन आहे. त्याची स्थापना इंग्लंडच्या बुकर मॅककॉनेल कंपनीने 1969 मध्ये केले होती.