विज्ञान-तंत्रज्ञान / अंतरिक्ष

ISRO GSLV Launch :, अत्याधुनिक NVS-01 उपग्रह नियोजित कक्षेत

भारताने आणखी एका कृत्रिम उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. ISRO – इस्रोच्या GSLV F12 या प्रक्षेपकाने-रॉकेटने NVS-01 हा दिशादर्शक उपग्रह २५२ किलोमीटर या नियोजित उंचीवर अपेक्षित वेगासह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला.

NVS-01 हा उपग्रह IRNSS-1G या उपग्रहाची जागा घेणार आहे.

भारतीय उपखंडात संरक्षण क्षेत्र आणि नागरी वापराकरता दिशादर्शक म्हणून या उपग्रहाचा वापर होणार आहे.

स्वदेशी बनावटीची ही दिशादर्शक प्रणाली अमेरिकेच्या जीपीएस प्रमाणे काम करत आहे. NVS-01 प्रमाणे याआधीच सहा उपग्रह हे कार्यरत आहेत.

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २१ ऑगस्ट २०२१ ला GSLV या रॉकेटच्या शेवटच्या टप्प्यात बिघाड झाला होता, शेवटचा क्रोजेनिक इंजिनाचा टप्पा हा सुरु झाला नव्हता, त्यामुळे ते प्रक्षेपण अयशस्वी झाले होते. त्यामुळे अशाच GSLV चे प्रक्षेपण आज होणार असल्यानं इस्रोमध्ये आज काहीसे तणावाचे वातावरण होते. 

भारताच्या ऐरावत सुपरकॉम्युटर यादीमध्ये ७५ व्या स्थानावर

TOP500 Project च्या ६१ व्या आवृत्तीच्या यादीमध्ये भारताच्या ऐरावत सुपरकॉम्युटर ७५ व्या स्थानावर आहे.

भारताच्या ‘ऐरावत’चा देखील आहे समावेश

भारताचा AI सुपरकॉम्प्युटर ‘ऐरावत’ (AIRAWAT) TOP500च्या यादीमध्ये ७५ व्या स्थानावर आहे. ही सिस्टीम पुणे शहरामध्ये स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय PARAM Siddhi-AI supercomputer, Pratyush supercomputer आणि Mihir supercomputer या कॉम्युटर सिस्टीमदेखील या यादीमध्ये आहेत.

TOP500 Project हे जगातील सर्वात शक्तिशाली ५०० सुपरकॉम्युटर्सची माहिती प्रसिद्ध केली जाते. या प्रकल्पाद्वारे वर्षातून दोनदा दमदार कॉम्युटर सिस्टीमची क्रमवार यादी तयार केली जाते. याचा वापर सध्या संगणकांच्या क्षमतेचा मापदंड म्हणूनही केला जातो.

१९९३ मध्ये याची सुरुवात झाली होती. 

यंदाच्या ६१ व्या आवृत्तीमध्येही नव्या लोकप्रिय सुपरकॉम्युटर्सचा उल्लेख करण्यात आला आहे.

मागच्या आवृत्तीप्रमाणे, यंदाच्या यादीमध्येही चीन आणि अमेरिका या दोन देशांमधील सुपरकॉम्युटर्सच्या सर्वाधिक समावेश आहे

Frontier ही TOP500 च्या यादीतील पहिल्या क्रमांकावरील सुपर कॉम्युटर सिस्टीम आहे.अमेरिकेतील टेनेसी येथी Oak Ridge National Laboratory (ORNL) येथे हा सुपर कॉम्युटर आहे. या सिस्टीमने सध्या 8,699,904 कोर वापरून 1.194 Exaflop/s गाठले आहे. HPE Cray EX SYSTEM ही सिस्टीम एका Exaflop/s पेक्षा जास्त कामगिरी असलेली पहिली अमेरिकेतील पहिली सिस्टीम आहे. HPE Cray EX आर्किटेक्चर हे HPC आणि AI साठी ऑप्टिमाइझ केलेले 3rd Gen AMD EPYC CPUs, AMD Instinct 250X एक्सीलरेटर्स आणि Slingshot-11 इंटरकनेक्टसह एकत्र करते.

TOP500च्या यादीतील दुसरी सुपर कॉम्युटर सिस्टीम म्हणजे Fugaku. ही सिस्टीम जपानच्या कोबे शहरातील RIKEN सेंटर फॉर कॉम्प्युटेशनल सायन्स (R-CCS) येथे आहे. यात 7,630,848 कोर असल्याने सिस्टीमला 442 Pflop/s चा HPL बेंचमार्क स्कोअर मिळवणे शक्य झाले.

फिनलंडच्या CSC येथील EuroHPC केंद्रातील पर कॉम्युटर सिस्टीम यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. ही HPE Cray EX System 309.1 Pflop/s च्या परफॉर्मन्स देते. युरोपियन हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग जॉइंट अंडरटेकिंग (EuroHPC JU) या संस्थेच्या प्रचंड डेटावर प्रक्रिया करण्यासाठी Exascale सुपर कॉम्प्युटर विकसित करण्यासाठी युरोपियन संसाधने फिनलंडमध्ये एकत्र केली जातात.

संदर्भ : लोकसत्ता

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने नौदलाच्या तळावरून बीएमडी इंटरसेप्टर  क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने 21 एप्रिल 2023 रोजी बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनार्‍यालगत  समुद्रात स्थित तळावरून एंडो-एटमोस्फेरिक इंटरसेप्टर इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वीपणे पहिली उड्डाण चाचणी  घेतली.

चाचणीचा उद्देश शत्रूंच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या धोक्याला लक्ष्य  करणे आणि त्याचा प्रभाव नष्ट करणे हा होता. यामुळे भारतीय  नौदलाला बीएमडी क्षमता असलेल्या खास राष्ट्रांच्या समूहात स्थान मिळू शकते.

याआधी, डीआरडीओने प्रतिस्पर्ध्यांकडून उद्भवणाऱ्या  बॅलिस्टिक क्षेपणास्त्र धोक्यांना निष्फळ  करण्याची क्षमता असलेली जमीनीवरील  बीएमडी प्रणालीची   यशस्वी चाचणी  केली आहे.

संरक्षण  मंत्री  राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ,भारतीय नौदल आणि जहाजावरील  बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण क्षमतांच्या यशस्वी प्रात्यक्षिकात सहभागी असलेल्या सर्व सहभागी संस्थांचे अभिनंदन केले.

डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर व्ही कामत यांनी क्षेपणास्त्राच्या रचना  आणि विकासामध्ये सहभागी असलेल्या चमूचे कौतुक केले. 

कोप इंडिया सराव 2023

भारतीय हवाई दल (IAF) आणि युनायटेड स्टेट्स एअर फोर्स (USAF) यांच्यात कलाईकुंडा, पानगढ आणि आग्रा इथल्या भारतीय हवाई दलाच्या तळांवर  गेले दोन आठवडे आयोजित करण्यात आलेल्या कोप इंडिया 2023 या द्विपक्षीय हवाई सरावाच्या  सहाव्या  आवृत्तीची  24 एप्रिल 2023 रोजी सांगता झाली.

या सरावात भारतीय हवाई दलाच्या राफेल, तेजस, Su-30MKI, जग्वार, C-17 आणि C-130 सारख्या आघाडीच्या विमानांनी सहभाग घेतला. तर युनायटेड स्टेट्स एअर फोर्स ची F-15 ‘स्ट्राइक ईगल’ फायटर, C-130, MC-130J, C-17 आणि B1B, स्ट्रॅटेजिक लढाऊ  विमाने सहभागी झाली होती.

या सरावामध्ये जपानी हवाई सेल्फ डिफेन्स फोर्सचे  कर्मचारी  पर्यवेक्षक म्हणून सहभागी झाले होते.

या संयुक्त सरावामुळे सहभागी राष्ट्रांच्या हवाई दलांमध्ये परस्पर संवाद, परस्परांच्या सर्वोत्तम पद्धतींचे आदान-प्रदान आणि एकत्रित मोहिमेद्वारे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी उत्तम संधी उपलब्ध झाली.

 या सरावादरम्यान, मैत्री आणि सौहार्द यांचे बंध अधिक दृढ व्हावेत, यादृष्टीने सांस्कृतिक आदानप्रदान विषयक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते.

हा सराव दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणार्‍या  दोन हवाई दलांमध्ये असलेले दृढ संबंध कायम राखून ते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी  खोलवर रुजलेल्या वचनबद्धतेला उजाळा देतो.