22 May 2023

श्रीनगरमध्ये जी20 टूरिज्म वर्किंग ग्रुप ची बैठक

22 ते 24 मे दरम्यान जी 20 टूरिज्म वर्किंग ग्रुप ची बैठक श्रीनगरमध्ये होत आहे.

2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर, राज्यात पहिल्यांदाच मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

भारताचा शेजारी देश चीनने जम्मू-काश्मीरमधील या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता आणि त्याला विवादित क्षेत्र म्हटले होते. चीनच्या या भूमिकेवर भारताने तीव्र आक्षेप घेतला आहे.

चीनने पाकिस्तानसोबत संयुक्त निवेदन जारी करून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. चीन या बैठकीला उपस्थित नाही. श्रीनगरमध्ये G20 टुरिझम वर्किंग ग्रुपची बैठक घेण्यासही पाकिस्तानने विरोध केला आहे.

G20 बद्दल:
G20 ची स्थापना 1999 मध्ये G7 देशांनी केली.

दरवर्षी G20 अंतर्गत, त्यात सामील असलेले देश G20 शिखर परिषद आयोजित करतात.

2023 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येत आहे.

G20 मध्ये समाविष्ट असलेले देश:
अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि युरोपियन युनियन.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023