11 April 2023

व्याघ्रगणना: भारतात वाघांची संख्या ३१६७ वर पोहोचली, पंतप्रधान मोदींनी नवीन आकडेवारी जाहीर केली

सन 2022 पर्यंत, भारतातील वाघांची लोकसंख्या 3167 पर्यंत वाढली आहे, जी मागील जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा 200 अधिक आहे. भारताच्या व्याघ्रगणनेच्या पाचव्या चक्राची आकडेवारी जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही आकडेवारी सादर केली आहे.

वाघांची संख्या किती आहे?
2018 च्या जाहीर झालेल्या व्याघ्र गणनेनुसार वाघांची संख्या 2,967 होती. गेल्या चार वर्षांत भारतातील वाघांच्या संख्येत 200 किंवा 6.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

टायगर प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण
प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी कर्नाटकातील म्हैसूरच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पालाही भेट दिली.

प्रोजेक्ट टायगर बद्दल:
1 एप्रिल 1973 रोजी भारत सरकारने वाघांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने प्रकल्प टायगर सुरू केला.
त्याची सुरुवात तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून केली होती. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) ची स्थापना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 च्या कलम 38 एल (1) अंतर्गत करण्यात आली आहे.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023