5 April 2023

डोनाल्ड ट्रम्प यांची शरणागती; गुन्हेगारी खटल्यात अटक होणारे पहिले राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येथील मॅनहॅटन न्यायालयात शरणागती पत्करली आहे. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार दुपारी दीडच्या सुमारास ते शहरातील ‘ट्रम्प टॉवर’ या आपल्या निवासस्थानातून न्यायालयात दाखल झाले.

त्यामुळे तांत्रिकदृष्टय़ा त्यांना अटक झाली असून गुन्हेगारी प्रकरणात अशी कारवाई होणारे ते पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

२०१६च्या अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारादरम्यान विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या वकिलांमार्फत ‘पॉर्न स्टार’ स्टॉर्मी डॅनिएल्स हिला तब्बल १ लाख ३० हजार डॉलर दिले होते.

ही रक्कम त्यांनी आपल्या निवडणूक खर्चात दाखविली नाही, तसेच एका कंपनीच्या खात्यातून हे पैसे वळते केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023