12 April 2023

विकासदर सहा टक्क्यांखाली; भारताबाबत ‘आयएमएफ’चा अंदाज

२०२३-२४ या चालू आर्थिक वर्षांसाठी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढीचा दर २० आधार बिंदूंनी कमी होऊन ५.९ टक्क्यांपर्यंत घसरेल, असा धोक्याचा इशारा देणारा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) वर्तविला.याआधी आयएमएफने विकासदर ६.१ टक्के राहण्याचे भाकीत केले होते.

सुधारित अंदाजानंतरही भारतच जगातील सर्वाधिक वेगाने आर्थिक विकास साधणारा देश असेल, असे आयएमएफने स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन दर्शविणाऱ्या अहवालाने, जागतिक अर्थवृद्धीही २०२३ सालात २.९ टक्क्यांवरून, २.८ टक्क्यांवर येण्याचे सुधारित अनुमान पुढे आणले आहे.

Recent Posts

Forbes’ Top Billionaires 2023:

Posted On : 6 April 2023