इतर

राज्याचा महा अधिवक्त्ता – कलम १६५

 १ ) प्रत्येक राज्याचा राज्यपाल , उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त्त होण्यास जी व्यक्त्ती अर्हताप्राप्त असेल अशा एखाद्या व्यक्त्तीस राज्याचा महा अधिवक्त्ता म्हणून नियुक्त्त करील .

२ ) राज्यपालाकडून महा अधिवक्त्याकडे वेळोवेळी निर्देशिल्या जातील अशा विधिविषयक बाबींवर राज्य शासनाला सल्ला देणे आणि त्याला नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामे करणे आणि या संविधानाद्वारे किंवा त्याखाली किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याखाली त्याच्याकडे सोपवण्यात आलेली कार्ये पार पाडणे , हे त्याचे कर्तव्य असेल .

३ ) महा अधिवक्त्ता राज्यपालाची मर्जी असेपर्यंत अधिकारपद धारण करील . आणि त्यास राज्यपाल निर्धारित करील असे पारिश्रमिक मिळेल .